Ad will apear here
Next
प्रेमातून प्रेमाकडे
मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण काहीवेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री-पुरुषामधील असेल, तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबंधातील मैत्र अरुण ढेरे यांनी ‘प्रेमातून प्रेमाकडे’मधून वाचकांपुढे उलगडले आहे.

मार्गारेट नोबेलने विवेकानंद यांना प्रथम पाहिले तेव्हाच त्यांना जीवन समर्पण करण्याचा निश्चय केला. स्वामींनी समाजकार्यासाठी निवेदिताच्या रूपात तिला शिष्यत्त्व बहाल केले. निवेदिता व गोपाल कृष्ण गोखले यांचे सौहार्दाचे मित्रत्त्व, गोखले व सरोजिनी नायडू यांचे स्नेहसंबंध, ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला स्वररचना देणाऱ्या व महात्मा गांधी यांची अधार्मिक प्रेरणा बनलेल्या सरलादेवी घोषाल, ब्रिटनमधील मेडेलिन स्लेड उर्फ मीरा बेन हिची गांधीजींवरील उत्कट प्रेमभक्ती, रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतून व्यक्त झालेली अॅना उर्फ नलिनी तसेच त्यांची वहिनी कादंबरी, रवींद्रनाथांसाठी काहीही करायला तयार असणारी व्हिक्टोरिया ओकॅम्पो, सुभाषचंद्र बोस व एमिली यांचा विवाह, सेनापती बापट व त्यांची रशियन मैत्रीण अॅना, डॉ. आंबेडकर व फॅनी यांच्यातील नाते यावर यात प्रकाश टाकला आहे.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन
पाने : २५६
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZSEBS
Similar Posts
कवितेच्या शोधात कविता करणे हा अनेकांचा छंद असतो. कविता अनेक प्रकारच्या असतात. त्यातून प्रेम, माया, भक्ती, राग-लोभ, चीड, संताप अशा मनातील सर्व भावना व्यक्त होतात. संतांच्या रचना याही कवितेचाच एक भाग असतात. अशा अनेकविध काव्याचे व कवींचे रसग्रहण अरुणा ढेरे यांनी ‘कवितेच्या शोधात’ यातून केले आहे.
आलटून पालटून सामाजिक, राजकीय व धार्मिक अपप्रवृत्तींवर व्यंगचित्राद्वारे प्रहार करता येतो. ‘मनाला झालेला आनंद हाच त्या व्यंगचित्राचा अर्थ’ असे वर्णन करणारे मधुकर धर्मापुरीकर यांना ही आनंद ‘आलटून पालटून’मधून वाचकांमध्येही वाटला आहे.
‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकाचे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन उदगीर (लातूर) : ‘आजार व उपचारपद्धतींबरोबरच मनाला आनंद देणारे मानवी स्वभावाचे अनेक पैलू डॉ. संजय कुलकर्णी यांनी ‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकातून मांडले आहेत. यात प्रसंगानुरूप छोटे लेख असले, तरी मोठा अर्थ व्यक्त करणाऱ्या मुक्त लेखनाचा हा चांगला नमुना आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ
प्रेरणा आयुष्य सगळेच जण जगत असतात; पण ते रडत-कुढत जगायचे की हसत-खेळत हे प्रत्येकाच्या स्वभावावर व विचारांवर अवलंबून असते. म्हणूनच आनंददायी जीवनासाठी विनोद अ. बांदोडकर यांनी ‘प्रेरणा’ या पुस्तकातून केलेले लेखन मार्गदर्शक ठरते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language